Delhi-Mumbai Expressway Road caved: मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. हा महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने रस्ता खचल्याबद्दल उंदरांना जबाबदार धरले होते. केसीसी बिल्डकॉन या कंपनीचा कनिष्ठ कर्मचारी असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले होते की, उंदरांमुळे महामार्ग खचला. या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता कंपनीने सदर कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०२३ रोजी या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण केले होते. या दुसऱ्या टप्प्यात राजस्थानमधील ३७३ किमी, मध्यप्रदेशमधील २४४ किमी आणि हरियाणामधील ७९ किमी टप्प्याचे अनावरण झाले होते. तर सोहना-दौसा हा टप्पा आधीपासूनच कार्यरत होता.