बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही त्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काऊंटर करायला संजय राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील, असं भरत गोगावले म्हणाले.