Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले. अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भातील सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.