सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिमध्ये एका ट्रेमध्ये सीलपॅक असलेले लाडू आहेत. परंतु, त्यातील एका पॅकमध्ये उंदरांची पिल्ले दिसत आहेत. हा प्रसाद मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे मुंबईकरांनीही संताप व्यक्त केला. त्यावर आता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.