२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. कारण त्या घटनेने मुंबईचा इतिहास बदलला आणि मुंबईकरांच्या छातीत पावसाने एक धडकीच भरवली. गेल्या अनेक वर्षांमध्ये पावसाच्या पॅटर्नमध्ये जसा बदल झाला आहे, तसाच हवामानशास्त्र विभागामध्येही बदल झाला आहे. तंत्रज्ञान बदललंय, वेधशाळेच्या कामामध्ये तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडवले आहेत. याशिवाय वादळं नेमकी केव्हा होतात, का होतात या व अशा अनेक कुतूहलजन्य प्रश्नांबद्दल कुलाबा क्षेत्रीय वेधशाळेचे संचालक डॉ. सुनील कांबळे यांच्याशी साधलेला संवाद!