Tumbaad Cinema Purandare Wada History: दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘तुंबाड’ चित्रपट दुसऱ्यांदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुनः प्रदर्शित करण्यात आला असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट २०१८ साली पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु त्यावेळी अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता तोच चित्रपट परत प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटाने सात दिवसातच आधीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील अनेक पैलूंनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे या चित्रपटात दिसणारा वाडा. हा वाडा नक्की कुठे आहे? आणि त्या वाड्याचा नेमका इतिहास काय? याचा घेतलेला हा आढावा.