मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे यादिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने विचार करून तात्काळ त्यांचे उपोषण स्थगित करावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कुठल्याही प्रश्नापेक्षा जरांगे पाटील यांचं जीवन मोलाचं आहे असं म्हणत चव्हाण यांनी सरकारला हे उपोषण थांबवण्याची विनंती केली आहे.