80 Year Old Women Viral Video For Pension : वृद्ध आणि अपंग व्यक्तींना योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणं यात फायदा असला तरी खेडे गावातील वृद्ध आणि अपंग व्यक्तींना ते पैसे काढण्यासाठी शहराच्या ठिकाणी किंवा जेथे बँक असेल तेथे जावं लागतं हा मुद्दा सुद्धा नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. हा मुद्दा आता नव्याने पुढे येण्याचं कारण म्हणजे ओडिशामधील केओंझारमध्ये पेन्शनचा लाभ घेण्यासाठी एका ८० वर्षीय महिलेची झालेली पायपीट सध्या ऑनलाईन व्हायरल झाली आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना नेमकी काय आहे हे आजच्या व्हिडीओमध्ये पाहूया.