पिंपरी चिंचवडच्या महाळुंगे परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या पायऱ्यांवर 85 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी २३ वर्षीय जयचंद्र पुरी या तरुणाला अटक केली आहे. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.