भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत यांना न्यायालयाने २५ हजार रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.