भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल अंतिम राहत नाही. कदाचित आमच्याकडून बाजू मांडताना काही कमतरता राहिली असेल. त्यामुळे वरीष्ठ न्यायालयात पुन्हा नव्याने बाजू मांडू असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.