Badlapur Sexual Assault Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज दुसरी सुनावणी पार पडणार आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. तर आज अक्षय शिंदेचे वकील अमित कातरनवरे यांनी पत्रकारांसमोर काही तक्रारी मांडल्या आहेत. तसेच बदलापूरच्या ज्या शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची चर्चा आहे त्याच शाळेतील अन्य अधिकारी अजूनही फरार आहेत असं म्हणत त्यांनी हेच सरकारचं अपयश असल्याचं म्हणत टीकाही केली आहे.