Akshay Shinde Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी कल्याण न्यायालयात आज अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी चार्टशीटसाठी अर्ज दाखल केला आहे. अक्षय शिंदेचे काका, वकील, आई-वडील या सर्वांनी कोर्टात हा अर्ज सादर केला आहे. या वेळी पोलिसांकडून त्याच्या दफनविधीबाबत फोन आला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. याचबरोबर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांसह त्याच्या वकिलांसाठी संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.