मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सिप्ज कंपनी येथील गेट क्रमांक ३ समोरील रस्त्यावरील उघडया चेंबरमध्ये पडून पवईतील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. विमल अप्पाशा गायकवाड असे महिलेचे नाव आहे. काल रात्री घरी जात असताना तुफान पावसात पाण्याचा अंदाज न आल्याने गेट समोरील उघड्या नाल्यात त्या पडल्या आणि वाहून गेल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने विमल यांना शोधण्यात यश आलं आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.