Porn Star Riya Barde Arrested from Ulhasnagar: मुंबई उपनगरांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगरमधून पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या पॉर्नस्टारचं आख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘भारतीय’त्वाची ओळख मिरवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.सदर पॉर्नस्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे.