पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. पुणे शहरातील नागरिकांना शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असा सवाल महाविकास आघाडीने केला होता. तसंच मेट्रो मार्गाचं उद्घाटन आजच करा, आम्ही उद्घाटन करतो, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाबरोबरील चर्चांनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यात सुरु केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते.