Devendra Fadnavis on Gautam Adani & Dharavi Redevelopment Project : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने धारावी झोपडपट्टी पुनर्वसन व विकास प्रकल्पाचं काम अदाणी समुहाला देण्यावरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. पुनर्वसन व विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून सध्या वाद चालू आहे. मुंबईत कोणताही बांधकाम व्यावसायिक किंवा विकासक एखादं घर बांधत असेल, इमारत उभी करत असेल तर त्याला ४०% टीडीआर अदाणी किंवा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाकडून (Dharavi Redevelopment Project Authority) खरेदी करावा लागेल. असं झाल्यास मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडतील किंवा मुंबईतील घरांच्या किमती गौतम अदाणींची कंपनी नियंत्रित करू शकेल, असा आरोप केला जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.