Akshay Shinde Burial High Court to State Govt.: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी बदलापूरनंतर अंबरनाथ शहरातूनही विरोध झाला. गुरुवारी अक्षयचे पालक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफन विधीची जागा पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर दफनविधीच्या परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. तर अंबरनाथ मनसेच्या वतीने शहरात दफनविधी करण्याला विरोध केला गेला. यानंतर अक्षय शिंदेच्या पालकांचे वकील अमित कातरनवरे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सोमवारपर्यंत अंत्यविधी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाच्या सूचना योग्यच असून अंत्यविधी झालाच पाहीजे, अशी भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान काय झालं? वकील व गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले हे आपण आता पाहूया.