Manoj Jarange Patil Elections 2024: मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरले असून, मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले.सांगली दौऱ्यावर असलेल्या ॲड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितले, विधानसभा निवडणुका होणार, की पुढे ढकलल्या जाणार, ही साशंकता आता संपली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकमुळे निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.