अरबाज पटेल घरातून बाहेर पडताच त्याचं निक्कीवरील प्रेम उतू जात असल्याचं साधारण सगळ्याच मुलाखतींमधून दिसून येत आहे. आणि आता तर चक्क अरबाजने निक्कीला प्रपोज करायचं झाल्यास कसं प्लॅनिंग करणार हेच सांगून टाकलं आहे. एकीकडे फॅमिली स्पेशल वीकमध्ये निक्कीच्या आईने अरबाजच्या साखरपुड्याचा विषय काढत दोघांच्या नात्यात ठिणगी टाकली होती, निक्कीने तीच ठिणगी धरून अरबाजचे घरातील कपडे टाकायला सांगत ठणठणा केला होता आणि आता अरबाजने थेट निक्कीला प्रपोज करायचाच विषय काढल्यामुळे या दोघांच्या नात्याचा चक्रव्ह्यू आणखी कठीण होत चालला आहे. नेमकं असं अरबाजने काय म्हटलंय पाहूया.