मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. शासनाकडून बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. बैठकांमध्ये काही होत नसतं. आचारसंहितेच्या आधी आरक्षण द्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं आहे हे लक्षात असू द्या. तुमची चाल आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.