राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी अजित पवार गटाला दिलं असलं, तरी खरी राष्ट्रवादी कोणाची हा वाद सुरूच आहे. आता अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात येण्यास इच्छूक आहेत. या पत्रकाराच्या पश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.