नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवरील हरिहर गडाजवळील प्रसिध्द शितकडा धबधब्यावर प्रस्तरारोहण करण्यासाठी जमलेल्या पर्यटकांवर रविवारी दुपारी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. जखमी आणि हल्ल्यापासून बचावलेले हे सर्वजण कल्याण, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील आहेत. रॅपलिंगसाठी तयारी सुरू असताना निरीक्षणासाठी उडवलेल्या ड्रोनमुळे मधमाश्यांनी गिर्यारोहकांवर हल्ला केला.