Badlapur Sexual Assault Mumbai High Court: बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी शाळेच्या दोन आरोपी विश्वस्तांना पकडण्यात आलेल्या अपयशावरून सुनावलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपींना पकडण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे पोलीस या प्रकरणात त्यांना अटक कशी करू शकत नाहीत, असा सवाल केला.बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. जामीन मिळावा म्हणून शाळा संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. या दोन आरोपींवर नेमकं काय, अक्षय शिंदे प्रकरणाचा अपडेट काय हे आता आपण पाहूया.