२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे नवं समीकरण महाविकास आघाडीच्या रुपात महाराष्ट्रात पाहायला मिळालं. मात्र मविआच्या स्थापनेपासूनच काँग्रेस हा पक्ष आघाडीमधला तिसरा पक्ष म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये हे चित्र बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेसनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे. २०१९ मध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी करण्यात अपयशी ठरलेला पक्ष यंदा विधानसभा निवडणुकीत मविआमध्ये सर्वाधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती काँग्रेस पक्ष मविआमधील ‘मोठा भाऊ’ठरण्याची. यामगच्या राजकीय परिस्थितीचा
आढावा व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.