अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली. परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी अभिनेता गोविंदा याच्या पायाला लागली. ही घटना १ ऑक्टोबरला घडली. जखमी झालेल्या गोविंदा यांना क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी गोविंदा यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.