Brave Woman Stops Robbery: पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका महिलेचं कौतुक होत आहे. घरात शिरलेल्या तीन चोरांना या महिलेनं मोठ्या धाडसानं रोखून धरलं. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण या महिलेचं कौतुक करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण एक्स या सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. चेहऱ्याला मास्क लावलेले तीन चोर या घरात शिरतात. तेव्हा घरात महिला आणि तिची दोन लहान मुलं उपस्थित असल्याचं दिसत आहे. एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा त्याप्रमाणे महिला धाडस दाखवून न घाबरता चोरांना थोपवून ठेवते. व्हायरल होणारे तीनही व्हिडीओ पाहूया.