आज सर्वपित्री अमावस्या आहे. आजच्या दिवशी सर्वत्र पितरांना श्राद्ध घालण्याची प्रथा पाळली जाते मात्र दुसरीकडे धुळ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने अनोख्या पद्धतीने धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात आक्रमक होत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच श्राद्ध घातले आहे. गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत यावेळी ठाकरे गटाच्या वतीने सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालण्यात आले.