आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. मविआच्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तर समाजवादी पक्षाने देखील मविआला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर १२ जागांची मागणी केली आहे.