Badlapur School Case: बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला. या प्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी दुर्लक्ष केले. बदलापुरातील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी कर्जत येथून अटक केली आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावरून फटकारले होते. त्याचवेळी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. त्याच्या २४ तासातच पोलिसांनी उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांना अटक केली आहे.