Pune Crime News: पुण्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलांनीच आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरापासून आरोपी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. शाळेतील गुड टच बॅड टच उपक्रमातून ही गंभीर घटना उघडकीस आली. शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.