पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील सहा वर्षाच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ४५ वर्षीय चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस
स्टेशनच्या आवारात असलेली स्कूल व्हॅन दगडाने फोडली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.