पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील सहा वर्षाच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कडक कारवाई करण्यात येत असून संस्था चालकांच यात काही दोष आहे का? हे तपासण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.