चिंचवड शहर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून आजही ओळखला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांचे विश्वासू चिंचवड विधानसभा इच्छुक भाऊसाहेब भोईर यांनी बंड करत चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. ते आगामी विधानसभा अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. यासंदर्भात भाऊसाहेब भोईर यांनी लोकसत्ताशी साधलेला हा संवाद…