भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इंदापूर येथील जाहीर सभेत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे.