अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात क्रिकेट किंग्डम अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा राशीन येथे आला होता. यावेळी मराठीत भाषण करत असताना रोहित शर्माने चाहत्यांची मनं जिंकली.