धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार किरण लहामाटे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याही समावेश आहे.