पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ दिवसांत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांचे विदर्भ आणि मुंबई-ठाण्यात महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील जगदंबा माता मंदिर, पोहरादेवी येथेही ते भेट देणार आहेत.