बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले उद्या (६ ऑक्टोबर रोजी) होणार आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी-5’या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी हा शो बघणाऱ्या प्रेक्षकांनी लोकसत्तासोबत संवाद साधला. यावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या बिग बॉसच्या घरातील आवडत्या स्पर्धकाबद्दल सांगितलं.