मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं. जर ही योजना १९४७ साली सुरू झाली असती तर मी दोन वेळेला जेवले असते, असं म्हणत त्यांनीया योजनेबद्दल सरकारचे आभार मानले आहेत.