अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे माजी खासदार तथा स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत येऊन ते आंदोलन करणार आहेत. सध्या ते नवी मुंबई परिसरात दाखल झाले आहेत.