हरियाणाची जनता स्वाभिमानी आहे. हरियाणात काँग्रेसचंच सरकार येईल याबद्दल शंका नाही, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर हरियाणात भाजपा आघाडीवर तर काँग्रेस पिछाडीवर दाखवत आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.