आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. नुकताच भाजापाचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुलीसह राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला. मात्र पक्षात इनकमिंग सुरू असलं तरी ठरविक लोकांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय शरद पवारांनी घेतल्याचं आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.