जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभी निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा हे पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या बाजूनने जनतेचा कौल पाहायला मिळाला. तर हरियाणात शेवटच्या क्षणी भाजपाने डाव फिरवत ५० जागांवर मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला.