हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली. तेच हरियाणामध्ये काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणात भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये वातावरण निर्मिती करूनही काँग्रेसचे नेमके काय चुकले? दोन्ही विधानसभेच्या निकालामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? याबाबतचे सविस्तर विश्लेषण ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले आहे.