हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या भाजपाने नंतर थेट बहुमताचा आकडा गाठला. या यशाचा आनंद मुंबई भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचलं. तसंच जे हरियाणत घडलं तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात घडलेलं पाहायला मिळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.