हरियाणातील पराभव दुर्दैवी आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकता येतील. तसंच हरियाणातील निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. हरियाणा आणि जम्मू- काश्मीर विधानसभेचा निकाल मंगळवारी (९ ऑक्टोबर) जाहीर झाला. हरियाणामध्ये भाजपाला चांगलं यश मिळाल्यानंतर आता सत्ताधारी काँग्रेसवर टीकास्त्र डागत आहेत.