बिग बाॅस मराठीचं पाचवं पर्व नुकतचं संपलं असून आता. बिग बाॅस हिंदींचं १८वं पर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यंदाच्या या बिग बाॅसमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असेलेले वकील गुणरत्न सदावर्ते देखील सहभागी झाले आहेत. बिग बाॅसमधील त्यांच्या या या एन्ट्रीमुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. सदार्वर्ते यांनी नुकतंच बिग बाॅसमध्ये दुसऱ्या स्पर्धकांशी चर्चा करताना थेट महाराष्ट्रातील सत्तानाट्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या याच वक्तव्याची व्हिडीओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.