Why Tomato Prices Rising: सोन्याचे दर वाढतायत याचं आता लोकांना फार आश्चर्य वाटणंच बंद झालंय, बहुसंख्य जणांनी तर ते काय आता आपल्या बजेटमध्ये येत नसतंय म्हणत आपल्या मनाला समजवूनही घेतलंय. पण आता तितक्याच वेगाने एका रोजच्या वापराच्या वस्तूची किंमत सुद्धा वाढतेय आणि ती गोष्ट म्हणजे टोमॅटो. राजधानीत टोमॅटोच्या किमतीत नव्याने झालेल्या वाढीमुळे काही भागात १२० ते १३० रुपये किलोच्या भावाने टोमॅटो विकले जात आहेत. यावर उपाय म्हणून काही संस्थांच्या पुढाकाराने अनुदानित दरात म्हणजे ६५ रुपये प्रतिकिलो असे टोमॅटो विकले जात होते. मात्र तरीही आपण एक सरासरी पाहिल्यास देशात नागरिकांनी टोमॅटोच्या एक किलोसाठी ८० ते ९० रुपये मोजावे लागत आहेतच. दरम्यान मागील महिन्याच्या तुलनेत अचानक टोमॅटोचे दर वाढण्याचं कारण काय? येत्या काळात हे दर घटतील की अजून गगनाला भिडतील याविषयीची माहिती आता आपण पाहणार आहोत.