वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साधन, संपत्ती आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा नीतिमत्ता न सोडण्याचा नियम त्यांनी घालून दिला. टाटा यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा कायम राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं, अशा शब्दांत आंबेडकर यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.